नाशिक महापालिकेत फायरमन भरती!-Nashik Fireman Recruitment 2025!

Nashik Fireman Recruitment 2025!

नाशिककरांसाठी मोठी बातमी! नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तब्बल १८६ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबवली जात आहे.

Nashik Fireman Recruitment 2025!या भरतीत फायरमन आणि चालक-यंत्रचालक/वाहनचालक पदांचा समावेश असून, १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

ही संपूर्ण भरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत पार पाडली जाणार आहे. शासनाने आस्थापना खर्चाची अट शिथिल करून या भरतीसाठी विशेष परवानगी दिली आहे.

महापालिकेत सध्या अनेक पदे रिक्त असल्याने, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भरती अत्यंत आवश्यक मानली जाते. तरुणांसाठी ही एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ठरणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ: https://nmc.gov.in

Comments are closed.