शासनाने नोकरभरतीतील पारदर्शकता राखण्यासाठी आता फक्त तीन नामांकित संस्थांना परवानगी दिली आहे. लातूर बँकेने ‘टीसीएस’ आणि परभणी बँकेने ‘आयबीपीएस’ची निवड केली असताना, नांदेड जिल्हा बँक मात्र अजूनही अडचणीत आहे.
त्यांच्या भरतीवरील स्थगिती कायम राहिल्याने कर्मचारी भरतीची वाट पाहणाऱ्यांची निराशा वाढली आहे. “आम्ही इतक्या वर्षांपासून बँकेत नोकरीची वाट पाहतोय… पण आता आशा धुसर झाल्यात,” असे एका उमेदवाराने हळहळत सांगितले.
शासनाच्या नव्या नियमांमुळे नांदेड बँकेच्या संचालकांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या कार्यकाळात भरती होण्याची शक्यता फारच कमी आहे.
शेकडो उमेदवारांचे स्वप्न धुळीत… कोणाचं लग्न थांबलंय, कोणाचं घर चालत नाही — आणि भरती मात्र स्थगितीच्या कचाट्यात अडकली आहे.

Comments are closed.