नमो शेतकरी ८वा हप्ता: कधी जमा होणार?-Namo Shetkari 8th Installment Update!

Namo Shetkari 8th Installment Update!

महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. केंद्र सरकारकडील पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता काही आठवड्यांपूर्वीच खात्यात जमा झाला असला, तरी राज्याकडून मिळणारी अतिरिक्त मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे.

Namo Shetkari 8th Installment Update!राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने कोणतीही आर्थिक मदत थेट खात्यावर वर्ग करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक आहे. याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता सध्या रखडल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता दिला जाईल, अशी शक्यता असली तरी सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

दरम्यान, या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागाकडून योजनेची काटेकोर छाननी सुरू असून अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत. पीएम किसान योजनेत जशी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली, त्याच धर्तीवर राज्याच्या योजनेतही ४ ते ५ लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.

छाननीदरम्यान मृत लाभार्थी, दुहेरी लाभ घेणारे शेतकरी, आयकर भरणारे, शासकीय कर्मचारी आणि एका कुटुंबातून एकापेक्षा अधिक लाभ घेणारे यांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच रेशनकार्डचे नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया खऱ्या, गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी राबवली जात आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना आठवा हप्ता नक्की मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तरीही शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार?

याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed.