नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता – लाखो शेतकऱ्यांना दिलासा! | Namo Scheme’s 8th Installment Releasing Soon!

Namo Scheme’s 8th Installment Releasing Soon!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली असून, राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे. मागील काही हप्त्यांमध्ये निकष काटेकोर झाल्याने लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. २०व्या हप्त्याला जिथे ९६ लाख शेतकरी पात्र होते, तिथे २१व्या हप्त्यात ही संख्या ९२–९३ लाखांवर आली आहे.

Namo Scheme’s 8th Installment Releasing Soon!

सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे अनेक शेतकरी योजनेतून वगळले गेले आहेत.
यात सुमारे २८ हजार मृत लाभार्थी आणि ३५ हजार दुहेरी लाभार्थी वगळण्यात आले आहेत. याशिवाय रेशन कार्डावर आधारित एका कुटुंबात फक्त एकालाच लाभ देण्याचा नियम लागू झाल्याने नवरा-बायको दोघांना मिळणारा लाभ थांबविण्यात आला आहे.

तसेच आयटीआर भरलेले शेतकरी, सेवा क्षेत्रात कार्यरत व्यक्ती यांच्यावर कठोर तपासणी सुरू असून यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांमध्ये हप्त्याच्या तारखेची मोठी उत्सुकता असून, सध्याच्या राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.