सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी NABARD मध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत विकास सहाय्यक गट ‘ब’ आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ या पदांसाठी एकूण १६२ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक ४९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज प्रक्रिया १७ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख ०३ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरतीसाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाणार आहे: पहिला टप्पा पूर्व परीक्षा (ऑनलाईन) पात्रतेसाठी आणि दुसरा टप्पा मुख्य परीक्षा (ऑनलाईन) अंतिम निवडीसाठी. उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित केली जाईल आणि दोन्ही परीक्षा इंग्रजी व हिंदी भाषेत देता येतील. वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे असून अनुसूचित जाती/जमातींना ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीयांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
विकास सहाय्यक गट ‘ब’ साठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे, तर विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ साठी हिंदी/इंग्रजी माध्यमातून पदवी आवश्यक असून किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा सुमारे ४६,५०० रुपये (मूळ वेतन २३,१०० रुपये) वेतन मिळणार आहे. ही संधी प्रतिष्ठित सरकारी बँकेत करिअर सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

Comments are closed.