नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर भरती ! – NABARD Recruitment !

NABARD Recruitment !

केंद्रीय सरकारच्या मालकीची प्रतिष्ठित बँक नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) ने ‘असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-A)’ पदांसाठी २०२५-२६ भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण ९१ पदं असून, उमेदवारांना दरमहा ₹१,००,००० पेक्षा अधिक वेतन आणि इतर आकर्षक सुविधा मिळणार आहेत.

NABARD Recruitment !पदं विविध शाखांमध्ये उपलब्ध आहेत — जनरल, कॉम्प्युटर आणि IT, फायनान्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कंपनी सेक्रेटरी, फूड प्रोसेसिंग, इकॉनॉमिक्स, अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग, फिशरीज, लीगल, प्रोटोकॉल & सिक्युरिटी इत्यादी.

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष शाखांसाठी संबंधित तांत्रिक किंवा व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे.
वयमर्यादा: १ नोव्हेंबर २०२५ रोजी २१ ते ३० वर्षे. आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया: चार टप्प्यांत परीक्षा होईल —

  • प्रीलिम परीक्षा (१ सप्टेंबर २०२४ रोजी)
  • मुख्य परीक्षा
  • सायकोमेट्रिक टेस्ट
  • इंटरव्ह्यू

प्रीलिम परीक्षेत २०० गुणांचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, तर मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारात असेल.
अर्ज फी: सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹८५०/- तर अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ₹१५०/- इतकी फी लागू आहे.
ऑनलाईन अर्ज: www.nabard.org या संकेतस्थळावरून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत करता येतील.
ही भरती ग्रामीण विकास बँकिंग सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे.

Comments are closed.