N-PDF फेलोशिप 2026!-N-PDF Fellowship 2026!

N-PDF Fellowship 2026!

देशातील तरुण संशोधकांसाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) अंतर्गत राबवली जाणारी नॅशनल पोस्टडॉक्टोरल फेलोशिप (N-PDF) 2026 ही एक महत्त्वाची संधी आहे.

N-PDF Fellowship 2026!विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते. इच्छुक व पात्र उमेदवार १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या फेलोशिपअंतर्गत पात्र उमेदवारांना ₹80,000 प्रतिमहिना दिले जातील. ज्यांनी पीएचडी/एमडी/एमएसची थीसिस सादर केली आहे पण अंतिम पदवी मिळालेली नाही, अशा उमेदवारांना ₹50,000 प्रतिमहिना मिळेल. यासोबतच संस्थेला संशोधन व HRA साठी ₹2 लाख प्रतिवर्ष आणि ओव्हरहेड्ससाठी ₹1 लाख दिले जाणार आहेत.

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची PhD/MD/MS पदवी असावी. अर्जाच्या वेळी किमान दोन संशोधन निबंध प्रकाशित असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा ३५ वर्षे असून आरक्षित प्रवर्ग व महिला उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येते.

या फेलोशिपसाठी उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतील पात्र मेंटॉरची निवड करणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रिया तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवर आधारित असून गरज भासल्यास मुलाखत घेतली जाऊ शकते. फेलोशिपचा कालावधी २ वर्षांचा असून निवड प्रक्रिया साधारण दोन महिन्यांत पूर्ण होते.

अर्जासाठी उमेदवारांनी ANRF च्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. नियमांचे उल्लंघन, संशोधनात प्रगती न झाल्यास किंवा निधीचा गैरवापर झाल्यास ANRF कडून फेलोशिप रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे इच्छुक संशोधकांनी सर्व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Comments are closed.