महापालिका परीक्षा स्थगित!-Municipal Exam Cancelled

Municipal Exam Cancelled!

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी होणारी १६९ जागांची भरती परीक्षा प्रशासनाने रद्द केली आहे. २५ जानेवारी रोजी नियोजित असलेली ही परीक्षा उमेदवारांच्या आक्षेपांनंतर आणि संभाव्य गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आली.

परीक्षा केंद्रे खासगी असल्याबाबत उमेदवारांनी हरकती नोंदवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी आंदोलनही केले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप करत परीक्षा रद्द करण्याचे निर्देश दिले.

या भरतीसाठी तब्बल ४२ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुका, मराठा आरक्षण आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अनेकदा रखडली होती. आयबीपीएसमार्फत परीक्षा घेण्याचे नियोजन असून नव्या करारानंतर पदसंख्याही वाढवण्यात आली होती.

पारदर्शकता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे. नवीन परीक्षा तारीख, वेळ व केंद्रांची माहिती लवकरच पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून उमेदवारांनी फक्त अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.