एमयूएचएस हिवाळी परीक्षा सुरू!-MUHS Winter Exams Begin!

MUHS Winter Exams Begin!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी–२०२५ (टप्पा ३) परीक्षांना उद्या, २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या लेखी परीक्षा १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, राज्यभरातील १६६ परीक्षा केंद्रांवर सुमारे ८०,८८४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

MUHS Winter Exams Begin!या टप्प्यात वैद्यकीय, आयुष, नर्सिंग, पॅरामेडिकल, सार्वजनिक आरोग्य व व्यवस्थापनाशी संबंधित पदवी, पदव्युत्तर आणि संलग्न अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. विविध सेमिस्टर व अभ्यासक्रमांनुसार जुन्या-नव्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन प्रणाली प्रभावीपणे राबवली असून, प्रश्नपत्रिका परीक्षेदिवशीच थेट परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत.

उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग व डिजिटल मूल्यमापन पद्धतीने मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments are closed.