एमयूएचएस हिवाळी परीक्षा २०२५ला उद्यापासून सुरुवात; ८० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी! | MUHS Winter Exam 2025 Begins Tomorrow!

MUHS Winter Exam 2025 Begins Tomorrow!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) हिवाळी–२०२५ टप्पा–३ मधील पदवी, पदव्युत्तर तसेच विद्यापीठ संलग्न विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांना उद्या, शनिवार २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षा १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून राज्यभरातील १६६ परीक्षा केंद्रांवर सुमारे ८० हजार ८८४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

MUHS Winter Exam 2025 Begins Tomorrow!

या टप्प्यात वैद्यकीय, आयुष, नर्सिंग, पॅरामेडिकल, सार्वजनिक आरोग्य व व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पदवी स्तरावर बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएससी नर्सिंग (विविध सेमिस्टर), बीएएसएलपी, बीपीओ, बीपीटी (सीबीईएलपी) तसेच बीडीएस अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमांनुसार विविध वर्षांच्या परीक्षा या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

पदव्युत्तर स्तरावर एमडी (होमिओपॅथी) सह विद्यापीठ संलग्न बीपीएमटी, फार्मास्युटिकल अभ्यासक्रम, एमपीएच (नर्सिंग), एमबीए, बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्थल्मिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पीजी डीएमएलटी, सीसीएमपी, एमएमएसपीसी, एमपीएच आणि एमफिल अशा विविध अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन संगणक प्रणाली प्रभावीपणे राबवली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशीच थेट ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार असून, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे मूल्यमापन यापूर्वी यशस्वीपणे करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली आहे.

Comments are closed.