मुंबई विद्यापीठाने २०२६ च्या उन्हाळी सत्रातील पदवी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना पूर्ण तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून आसन क्रमांक आणि परीक्षा केंद्राची माहिती चार महिने आधीच डीयू पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वर्षी एकूण १,२३,९९८ विद्यार्थी राज्यभरातील ८९६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. बीकॉम, त्याच्या सर्व स्पेशलायझेशनसह बीएमएस (सत्र ६) यांच्या परीक्षा १ एप्रिलपासून सुरू होतील.
त्याचप्रमाणे बीएस्सी, बीएस्सी आयटी, कम्प्युटर सायन्स, बायोटेक, डेटा सायन्स, तसेच बीए तृतीय वर्ष आणि बीएएमएमसी सत्र ६ च्या परीक्षा ८ एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार आहेत.
याशिवाय विद्यापीठाने विविध स्वयंभरणी अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले असून सर्व विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहिती डीयू पोर्टलवर तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.