राज्यातल्या पायाभूत प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या एमएसआयडीसीला अखेर कायमचा आकृतीबंध मिळाला असून आता या महामंडळात मनुष्यबळ भरतीचा मार्ग मोकळा झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रस्ताव मान्य करून ४४ नियमित आणि ३२ बाह्ययंत्रणेद्वारे अशा ७६ पदांची भरती करण्याचं ठरवलं.
राज्यात रस्ते, विमानतळ, मेट्रो, वीज, बंदरे असे तब्बल २२ मोठे प्रकल्प राबवण्यासाठी २०२३ मध्ये एमएसआयडीसीची स्थापना झाली; पण कायमस्वरूपी पदे नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आकृतीबंध अंतिम करण्यात आला.
भरतीत मुख्य वित्तीय अधिकारी, वित्त सल्लागार यांसारख्या पदांसाठी तज्ज्ञांची नेमणूक, तसेच काही ठिकाणी प्रतिनियुक्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाह्ययंत्रणेद्वारे पदभरतीमध्ये स्वतंत्र कर्मचारी घेण्याऐवजी मल्टिटास्किंग स्टाफला प्राधान्य देण्याचंही सांगण्यात आलं.
आता व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवरही भरती होणार असून एमएसआयडीसीला कार्यक्षम मनुष्यबळ मिळण्याचा मार्ग आखेर सुकर झाला आहे.

Comments are closed.