महावितरण अभियंता-व्यवस्थापक भरती पुन्हा सुरू; अर्जासाठी पुन्हा खुली संधी! | MSEDCL Engineer-Manager Recruitment Reopened!

MSEDCL Engineer-Manager Recruitment Reopened!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण / MSEDCL) यांच्या अभियंता व व्यवस्थापक पदांसाठीची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काही कारणांमुळे अनेक उमेदवारांना वेळेत ऑनलाईन अर्ज करता आले नव्हते. अशा उमेदवारांना अंतिम संधी देत महावितरणने अर्जाची लिंक ३ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर पुन्हा सक्रिय केली आहे.

MSEDCL Engineer-Manager Recruitment Reopened!

या भरतीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वितरण व नागरी), उप कार्यकारी अभियंता (वितरण व नागरी), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा), व्यवस्थापक (वित्त व लेखा) तसेच उप व्यवस्थापक (वित्त व लेखा) या पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी मूळ जाहिरातीत नमूद केलेली वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर अटी-शर्ती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला www.mahadiscom.in भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Comments are closed.