महावितरणतर्फे विद्युत सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादी जाहीर — कागदपत्र तपासणी ६ व ७ नोव्हेंबरला! | MSEDCL Assistant Waitlist Released, Verification on Nov 6-7!

MSEDCL Assistant Waitlist Released, Verification on Nov 6-7!

महावितरणने अखेर विद्युत सहाय्यक पदासाठीची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. एकूण ५,३८१ पदांसाठी घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेनंतर ५० टक्के मर्यादेत १,८४७ उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MSEDCL Assistant Waitlist Released, Verification on Nov 6-7!

या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची आणि पात्रतेची पडताळणी येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.

महावितरणने या पदांसाठी २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. परीक्षेनंतर निवड यादी आणि उमेदवारांना नेमून दिलेल्या परिमंडळांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यापूर्वी २० ते २२ ऑगस्ट आणि ९ ते १० सप्टेंबर दरम्यान काही उमेदवारांची कागदपत्र तपासणी पूर्ण झाली होती.

दरम्यान, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांची निवड प्रक्रिया सध्या ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी १० सप्टेंबरला दिला आहे. त्यामुळे या प्रतीक्षा यादीत दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही.

उमेदवारांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी दिलेल्या तारखांना आपल्या परिमंडळ कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

Comments are closed.