MPSC निकाल २०२४: सोलापूरचा विजय लमकणे राज्यात अव्वल, हिमालय घोरपडे दुसरे, रवींद्र भाबड तिसरे! |MPSC Result 2024: Vijay Lamkane Tops Maharashtra!

MPSC Result 2024: Vijay Lamkane Tops Maharashtra!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याच्या विजय लमकणे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, हिमालय घोरपडे दुसऱ्या आणि रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

MPSC Result 2024: Vijay Lamkane Tops Maharashtra!

ही मुख्य परीक्षा २७ ते २९ मे २०२४ या कालावधीत पार पडली होती. त्यानंतर पात्र १५१६ उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या, आणि अखेर ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री हा अंतिम निकाल जाहीर झाला.

विजय लमकणे हे पूर्वीपासूनच एमपीएससीद्वारे विविध सेवांसाठी निवड झालेले अधिकारी असून, सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुण्याचे समर्थ बालगुडे ४२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून, ते काँग्रेस नेते संजय बालगुडे यांचे सुपुत्र आहेत.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेला हा निकाल विविध न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे.
अधिक माहितीसाठी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या: https://mpsc.gov.in.

Comments are closed.