पुण्यातून एक महत्वाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ९३८ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा रविवार, ०४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
इतक्या मोठ्या संख्येने पदांची जाहिरात झाल्यामुळे शेकडो उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एमपीएससीच्या इतिहासातील ही एक मोठी परीक्षा मानली जात आहे. या सर्व पदांसाठी बेसिक वेतन ६३,००० ते १,००,००० रुपये ठरवण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून, उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्रांची योग्य पडताळणी करून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२५ आहे. ऑनलाईन माध्यमातूनच परीक्षा शुल्क भरता येईल.
परीक्षेचे स्वरूप:
पूर्वपरीक्षा: १०० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी व चालू घडामोडी यांचा समावेश.
मुख्य परीक्षा: पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे घेण्यात येईल. अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी व चालू घडामोडी. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका अभ्यास करण्यास उपयोगी.
भरतीसाठी पदांचा तपशील:
उद्योग निरीक्षक – ९ पदे
तांत्रिक सहायक – ४ पदे
कर सहायक – ७३ पदे
लिपिक टंकलेखक – ८५२ पदे
ही परीक्षा महाराष्ट्रातील गट-क सेवा पदांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

Comments are closed.