MPSC PSI निकाल जाहीर!-MPSC PSI Result Out!

MPSC PSI Result Out!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार उमेदवार शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.

MPSC PSI Result Out!पात्र उमेदवारांची यादी, सीट नंबर आणि कटऑफ गुण एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.

मुख्य परीक्षेचा कटऑफ या वर्षी काहीशी वाढलेला आहे. ही परीक्षा 29 जून 2025 रोजी झाली होती, आणि निकाल 17 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेत दोन पेपर होते, आणि आता शारीरिक चाचणी व मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच वेबसाइटवर प्रकाशित केले जाणार आहे.

कटऑफ गुण वेगवेगळ्या श्रेणी व उपश्रेणीनुसार बदलतात. उदाहरणार्थ, जनरल मुलांसाठी कटऑफ 292.50, मुलींसाठी 275.50; ओबीसी मुलांसाठी 276, मुलींसाठी 255.50 आहे. इतर सर्व श्रेणींसाठी तसेच महिला, खेळाडू उपश्रेणीसाठी सविस्तर तक्ता एमपीएससी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Comments are closed.