MPSC–निवडणूक फटका: परीक्षा पुढे!-MPSC & Polls: Exams Postponed!

MPSC & Polls: Exams Postponed!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) जानेवारी २०२६ मधील काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.विद्यापीठाच्या १२१ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा ७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आल्या असून, त्यात नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण २६९ परीक्षा केंद्रांवर सुमारे १.४९ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

MPSC & Polls: Exams Postponed!महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ परीक्षा तसेच जाहीर झालेला महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम लक्षात घेता, १४, १५ आणि १६ जानेवारी २०२६ रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मुक्त विद्यापीठात नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, शिक्षक, गृहिणी व कामगार वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत असल्याने परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध होण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व परीक्षा केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. परीक्षांबाबतची अद्ययावत माहिती ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील Examination विभागात उपलब्ध आहे.

दरम्यान, विद्यापीठाचा ३१ वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणार असून, पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नाव अचूक येण्यासाठी विद्यार्थ्यांना नाव पडताळणी व दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.