एमपीएससी गट-ब परीक्षा बदलाची शक्यता! निवडणूक निकालामुळे आयोगाची चाचपणी! | MPSC Group-B Exam Date Change Likely!

MPSC Group-B Exam Date Change Likely!

‘गट ब’ संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होत असल्याने, त्याच दिवशी नियोजित असलेल्या एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. निकालाच्या दिवशी प्रशासन पूर्णपणे निवडणुकीच्या कामात गुंतलेले राहणार असल्याने, परीक्षा केंद्र व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक, कर्मचारी उपलब्धता या सर्व बाबींवर दबाव येण्याची शक्यता आहे.

MPSC Group-B Exam Date Change Likely!

लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसत असल्याने, तारखेत बदल करण्याबाबत आयोगाकडून चाचपणी सुरू आहे. परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आयोगाची अंतिम बैठक घेऊन निर्णय जाहीर होणार आहे. जर परीक्षेच्या नियोजनात अडचणी दिसल्या, तर तारीख बदलली जाऊ शकते; अन्यथा परीक्षा नियोजितप्रमाणेच २१ डिसेंबरला होण्याचीही शक्यता आहे.

निवडणूक निकाल पूर्वी ३ डिसेंबरला अपेक्षित होते; मात्र न्यायालयीन कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि त्यामुळे निकाल २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. याचा थेट परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर होऊ शकतो. परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणे, पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता या सर्व गोष्टींची तातडीने फेरतपासणी सुरू आहे.

Comments are closed.