Maharashtra Public Service Commission (एमपीएससी) मार्फत ‘औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा गट-ब चाळणी परीक्षा 2025’ येत्या रविवारी, 22 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात या परीक्षेसाठी एकूण 36 शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सकाळी 11 ते 12 या वेळेत परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी तब्बल 11,640 उमेदवार सहभागी होणार असून, व्यवस्थापनासाठी 1,234 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान दीड तास आधी केंद्रावर प्रवेश दिला जाणार असून, परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी केंद्राचे मुख्यद्वार बंद केले जाईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
तसेच प्रवेशपत्र, काळा/निळा बॉलपेन आणि ओळखपत्राची छायांकित प्रत याशिवाय इतर कोणतीही वस्तू परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांवरही पूर्ण बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments are closed.