एमपीएससी परीक्षा स्थगित ! – MPSC Exam Postponed !

MPSC Exam Postponed !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ डिसेंबर रोजी होणारी गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

MPSC Exam Postponed !स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतमोजणीमुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले. २१ डिसेंबरला मतमोजणीचे आदेश असल्याने, त्या दिवशी नियोजित एमपीएससी परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडील अहवालानुसार, अनेक ठिकाणी मतमोजणी केंद्रे आणि परीक्षा केंद्रे अगदी जवळ आहेत. त्याचप्रमाणे लाऊडस्पीकरचा गोंधळ, संभाव्य वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आणि परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता याही समस्या समोर आल्या.

या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नव्या तारखेनुसार तयारी करण्याची संधी मिळाली आहे. आयोगाने सर्व उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Comments are closed.