महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा व त्यांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात राज्यसेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, गट व व गट क यांसारख्या दहा परीक्षा समाविष्ट आहेत. हे वेळापत्रक शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होण्याच्या गृहितावर आधारित असून, उमेदवारांनी त्यानुसार आपले अभ्यासाचे नियोजन करावे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये ३५ संवर्गासाठी परीक्षा होणार असून, २९ मार्च २०२६ रोजी दोन सत्रांत, ५ एप्रिल रोजी एका सत्रात, १८ व १९ एप्रिल रोजी प्रत्येकी दोन सत्रांत आणि २६ एप्रिल रोजी दोन सत्रांत घेण्यात येईल. निकाल जुलै महिन्यात अपेक्षित आहे. महाराष्ट्र गट व अराजपत्रित संयुक्त सेवा २०२६, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मार्च २०२६ मध्ये जाहिरात अपेक्षित आहे.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५, सहाय्यक वनसंरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट व साठी पाय ते नऊ मे २०२६ दरम्यान घेण्यात येईल, निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होईल, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ पाच पदांसाठी, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ तीन पदांसाठी १६ मे २०२६ रोजी आयोजित होईल.
उमेदवाराने परीक्षा वेळापत्रकाच्या आधारे कोणती परीक्षा द्यायची याचा निर्णय स्वतः घ्यावा. परीक्षा भरण्यात येणारी पदे, अभ्यासक्रम व निवड पद्धतीची सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
१७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ चार पदांसाठी होईल. दोन्ही परीक्षा निकाल अनुक्रमे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहेत. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५ मुख्य परीक्षा ७ जून २०२६ रोजी संहा पदांसाठी होईल.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ एकूण २६ संवर्गासाठी ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान दोन सत्रांत होईल. १५ नोव्हेंबर रोजी विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, तसेच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आयोजित होतील. २१ नोव्हेंबर रोजी प्रशासन सेवा मुख्य परीक्षा व निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा आणि २६ ते ३० डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

Comments are closed.