MPSC अध्यक्ष भरती २०२५ — महिन्याला २,२५,००० वेतनासह सुवर्णसंधी! | MPSC Chairman Recruitment 2025 — ₹2,25,000 Salary!

MPSC Chairman Recruitment 2025 — ₹2,25,000 Salary!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी दरमहा २,२५,००० रुपये वेतन तसेच इतर भत्ते मिळणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय किमान ५० वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, अर्ज मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवायचे आहेत.

MPSC Chairman Recruitment 2025 — ₹2,25,000 Salary!

अर्जदारांनी ११ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि मागील १० वर्षांचे गोपनीय अहवाल किंवा मूल्यांकन अहवालाच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज प्रत्यक्ष, कुरिअर, स्पीडपोस्ट किंवा नोंदणीकृत डाकेने सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०० ०३२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

ही जाहिरात ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथून सह सचिव सुचिता महाडिक यांनी प्रसिद्ध केली असून, MPSC अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Comments are closed.