महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अनेक वर्षांनी महिला व बालविकास विभागातील मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण २५८ पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ ची अधिसूचना एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही संधी महिला व बालविकास तसेच ग्रामविकास विभागातील विद्यमान कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कुठल्या पदांसाठी भरती?
या भरतीत पुढील गट-ब (राजपत्रित) पदांचा समावेश आहे:
- अधीक्षक / निरीक्षक
- प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी
- रचना व कार्यपद्धती अधिकारी
- अधिव्याख्याता
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
- सांख्यिकी अधिकारी
बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), आयसीडीएस
ही सर्व पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांनाच अर्ज करता येईल.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू : २४ नोव्हेंबर २०२५
- अर्जाची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२५
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १४ डिसेंबर २०२५
परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्र आणि परीक्षा पद्धती (ऑनलाईन/ऑफलाईन) याची माहिती एमपीएससी स्वतंत्रपणे घोषित करेल.
भरतीची वैशिष्ट्ये
- दीर्घकाळानंतर मोठ्या प्रमाणावर – २५८ पदांची भरती
- मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – फक्त विभागातील कर्मचाऱ्यांसाठी
- महिला व बाल विकास आणि ग्राम विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उत्तम पदोन्नती संधी
जर तुम्ही या विभागात कार्यरत असाल आणि उच्च पदांवर जाण्याचे स्वप्न बाळगत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. वेळेत ऑनलाइन अर्ज पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.

Comments are closed.