एमपीएससी संयुक्त परीक्षेसाठी वय सवलतीची मागणी का वाढतेय? विद्यार्थ्यांचा संताप उसळला! | MPSC Age-Relaxation Demand Intensifies Nationwide!

MPSC Age-Relaxation Demand Intensifies Nationwide!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) 2025 च्या जाहिरातीत एकूण 674 पदे जाहीर झाली आहेत, त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांची संख्या 392 आहे. मात्र, या परीक्षेत वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष वय सवलत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

MPSC Age-Relaxation Demand Intensifies Nationwide!

यंदा जाहिरात नेहमीप्रमाणे डिसेंबर- जानेवारीत न निघता 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आणि परीक्षा 29 डिसेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वयोमर्यादा गणनेची तारीख 1 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वय फक्त 1-2 महिन्यांनी अधिक होत असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. गेली 3-4 वर्षे तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अन्यायकारक परिस्थिती ठरत आहे.

पूर्वी पोलीस भरती 2022-25 दरम्यान राज्य शासनाने वय ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची वय सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब — विशेषतः PSI उमेदवारांसाठीही तातडीने अशीच सवलत देण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनीही सीएम देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ही मागणी पुढे केली आहे.

PSI पदासाठी सध्या वयमर्यादा:

  • Open: 31 वर्षे
  • Reserved: 34 वर्षे

जाहिरात प्रसिद्ध होण्यास झालेल्या 7 महिन्यांच्या विलंबामुळे अनेक विद्यार्थी वयमर्यादेमुळे बाहेर पडत आहेत. मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने 1 वर्षाची वय सवलत दिली होती. तसेच 2025 च्या पोलीस शिपाई भरतीतही वय सवलत देण्यात आली आहे.

राज्यात PSI ची 2000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी मोठ्या मेहनतीने तयारी करतात, पण जाहिरातीतील विलंब आणि वयोमर्यादेतील अडथळे ही परिस्थिती विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरत असल्याची भावना परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र आहे.

Comments are closed.