महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२६ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षा आणि त्यांचे अंदाजे निकाल वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अराजपत्रित गट बी व गट क सेवा या परीक्षांचा कालावधी ठरवण्यात आला आहे.
याशिवाय, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा या परीक्षांचा कालावधी आणि निकालाची अंदाजे तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हे वेळापत्रक अंदाजे असून शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होण्याच्या गृहितकावर आधारित आहे.
उदाहरणार्थ, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ५ ते ९ मे २०२५, स्थापत्य अभियांत्रिकी व कृषी सेवा मुख्य परीक्षा १६ मे २०२५ होणार असून निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे. ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा आयोजित होणार आहे, निकाल ऑगस्ट २०२७ मध्ये जाहीर होईल.
तसेच, विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा परीक्षा नोव्हेंबर २०२६ मध्ये घेण्यात येतील आणि त्याचे निकाल २०२७ मध्ये प्रकाशित होतील. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा स्वतंत्रपणे जाहीर होतील.एमपीएससीने स्पष्ट केले आहे की ही तारीख अंदाजे असून शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होण्याच्या गृहितकावर आधारित आहे.

Comments are closed.