महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवेमधील ‘वित्त व लेखा सेवा गट-अ’ (सीएएफओ) या संवर्गातील पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पडलेली आहेत. ही पदे नियमितपणे भरली जावीत आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आता समान संधीची मागणी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मे २०२५ मध्ये झालेल्या ‘राज्य नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४’मध्ये सीएएफओ संवर्गातील ४३ पदे जाहीर करण्यात आली होती. या पदांसाठी बी.कॉम., एम.कॉम. किंवा एमबीए पदवी आवश्यक आहे. मात्र, मुलाखतीच्या टप्प्यावर १:३ या प्रमाणात पात्र उमेदवारांची संख्या अपुरी असल्याने अनेक पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठ वर्षांपासून या संवर्गातील अनेक पदे रिक्त असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीची संधी देण्यात आली, तर सीएएफओच्या सर्व रिक्त जागा भरता येतील, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
“परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुलाखतीची समान संधी मिळाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

Comments are closed.