महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षा 2023 चा अंतरिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. आयोगाने 26 सप्टेंबर 2024 रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली होती, तसेच 11 ते 18 मार्च 2025 दरम्यान उमेदवारांना पदांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची संधी दिली. मात्र, दोन आठवडे उलटूनही अंतरिम निकाल जाहीर झालेला नाही, यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दोन वर्षांहून अधिक वेळ लोटला!
राज्यसेवा 2023 प्रक्रिया सुरू होऊन 2 वर्षांहून अधिक कालावधी झाला. आयोगाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर…
- 4 जून 2023: पूर्वपरीक्षा
- 6 सप्टेंबर 2023: पूर्वपरीक्षेचा निकाल
- 20-22 जानेवारी 2024: मुख्य परीक्षा
- 16 जुलै 2024: मुख्य परीक्षेचा निकाल
- ऑगस्ट-सप्टेंबर 2024: वैद्यकीय तपासणी आणि मुलाखती
18 मार्च 2025 रोजी प्राधान्यक्रम भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तरीही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात वाढत आहेत शंका!
नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे उमेदवार मानसिक तणावात आहेत. आयोगाने तातडीने स्पष्टता द्यावी आणि निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
आता आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष!