मोदी सरकारची दिवाळी भेट: जीएसटी कपात! | Modi’s Diwali GST Gift!

Modi’s Diwali GST Gift!

देशभरात 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू झाले आहेत. या दरांमधील कपात ही मोदी सरकारची दिवाळी भेट मानली जात आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या असून, काही महत्त्वाच्या वस्तूंवर थेट शून्य कर लादण्यात आला आहे. केंद्र सरकारने यावेळी चालू आर्थिक वर्षापासून वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Modi’s Diwali GST Gift!

जीएसटी 2.0 : दैनंदिन वस्तूंसाठी सुलभ कर
नवीन जीएसटी प्रणाली (‘जीएसटी 2.0’) द्विस्तरीय दररचनेवर आधारित आहे. यामध्ये फक्त 5% आणि 18% हे दोन कर स्लॅब राहतील. देशातील दैनंदिन वापराच्या जवळजवळ 99 टक्के वस्तू 5 टक्के कर टप्प्यात आल्या आहेत. यामुळे घरगुती खर्चावर थेट फायदा होणार आहे.

अन्नपदार्थांवर शून्य कर
नवीन जीएसटी दरांतर्गत काही अन्नपदार्थांवर 0 टॅक्स लागू करण्यात आला आहे. यात छेना, पनीर प्री-पॅक्ड आणि लेबल्ड, UHT दूध, पराठा, भारतीय ब्रेड, पिज्झा ब्रेड, खाखरा, चपाती यांचा समावेश आहे. यामुळे घरगुती खाद्यवस्तूंचा खर्च कमी होईल आणि नागरिकांना थेट फायदा मिळेल.

शैक्षणिक आणि लॅब सामग्रीसाठी सवलत
नवीन दरांमध्ये शैक्षणिक सामग्री देखील समाविष्ट आहे. एक्सरसाइज बुक, रबर, ग्राफ बुक, नोटबुक्स, लॅबोरेटरी नोटबुक्स यांसारख्या वस्तूंवर शून्य कर लागू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळा यांना फायदेशीर बदल दिसतील.

औषध आणि वैद्यकीय साहित्य
काही औषधं व वैद्यकीय साहित्य देखील या सवलतीत आहेत. यामध्ये एंगल्सिडेस बीटा, मेपोलिजुमाब, टॅक्सिस्टामॅब, एलेक्टिनिब, पोलातुझुमॅब वेडोटिन यांसारखी महत्त्वाची औषधे आहेत. यामुळे रुग्णांवर खर्चाचा भार कमी होईल आणि आरोग्य सेवांमध्ये सुलभता येईल.

शेती व अन्नधान्यावरील प्रभाव
धान्य, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटे, काही चॉकलेट्स, कोको उत्पादने यांवर 5% जीएसटी लागू करण्यात आला आहे. सुका मेवा जसे की काजू, खजूर, पिस्ते यांवरही 5% कर लागेल. खते आणि शेतीसाठी लागणारी साधने यांवरचा जीएसटी 12% वरून 5% केला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि कृषी उद्योगांना थेट फायदा होणार आहे.

अप्रत्यक्ष कर सुधारणा : बचत उत्सव
या जीएसटी सुधारणा ‘बचत उत्सव’ म्हणून पाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना देशांतर्गत खरेदी आणि विक्रीला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केले. “मी स्वदेशी खरेदी करतो, मी स्वदेशी विकतो” ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजल्यास देशाचा आर्थिक विकास वेगाने होईल, असे ते म्हणाले.

एकंदर परिणाम
नवीन जीएसटी दरांचा थेट परिणाम सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि आरोग्य क्षेत्र यांना होणार आहे. शून्य कर आणि कमी कर स्लॅबमुळे वस्तू स्वस्त होतील, घरगुती खर्च कमी होईल आणि देशात खरेदीचा गतीशिल वातावरण निर्माण होईल. ही बदललेली जीएसटी रचना दीर्घकालीन आर्थिक फायदे निर्माण करणार आहे.

Comments are closed.