महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांसाठी भरती — तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! | MJP Recruitment 2025 — Golden Chance for 290 Govt Posts!
MJP Recruitment 2025 — Golden Chance for 290 Govt Posts!
महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक मोठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) यांनी एकूण २९० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार असून १९ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख असेल.

रिक्त पदांची माहिती:
या भरतीत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे —
- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – १४४ पदे
- सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट – ४८ पदे
- ज्युनियर क्लर्क / क्लर्क टायपिस्ट – ४६ पदे
- ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – १६ पदे
तसेच, अकाउंट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, स्टेनोग्राफर, असिस्टंट स्टोअरकीपर आणि इतर पदांसाठीही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे. काही पदांसाठी B.Com, B.E., B.Tech डिग्री अनिवार्य आहे, तर काहींसाठी डिप्लोमा, १०वी उत्तीर्ण किंवा मास्टर्स डिग्री आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासणे गरजेचे आहे.
वेतनश्रेणी:
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे —
- इंटरनल ऑडिट ऑफिसर / सीनियर अकाउंट्स ऑफिसर: ₹56,100 – ₹1,77,500/महिना
- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल/मेकॅनिकल), स्टेनोग्राफर: ₹38,600 – ₹1,22,800/महिना
- ज्युनियर क्लर्क / असिस्टंट स्टोअरकीपर: ₹19,900 – ₹63,200/महिना
- सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट: ₹25,500 – ₹81,100/महिना
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या दोन टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क:
- ओपन प्रवर्ग: ₹1000
- OBC/SC/PWD प्रवर्ग: ₹900
- माजी सैनिक (Ex-Servicemen): शुल्क नाही
ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी स्थिर आणि उच्च वेतनाची उत्कृष्ट सरकारी संधी ठरणार आहे.

Comments are closed.