१० कोटी नोकऱ्यांचे ध्येय!-Mission 100 Million Jobs!

Mission 100 Million Jobs!

देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असली तरी रोजगारनिर्मितीचा वेग अपेक्षेइतका नाही. ही दरी भरून काढण्यासाठी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पुढील दहा वर्षांत भारतात १० कोटी रोजगार निर्माण करणे हे आहे.

Mission 100 Million Jobs!दरवर्षी रोजगारक्षम वयोगटातील लोकसंख्येत सुमारे १.२ कोटींची वाढ होत असताना, पारंपरिक उद्योग क्षेत्रातून अपेक्षित प्रमाणात नोकऱ्या तयार होत नाहीत. त्यातच ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक प्राथमिक स्तरावरील नोकऱ्या कमी होत असल्याने, आर्थिक वाढ आणि रोजगार यातील समतोल बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या मोहिमेचा केंद्रबिंदू उद्योजकता वाढवणे, कौशल्य पुनर्विकास (Reskilling) आणि रोजगाराभिमुख उपक्रमांना चालना देणे असा असेल. उद्योगजगत, सामाजिक संस्था आणि सरकार यांच्या सहकार्याने हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून, रोजगारनिर्मितीला आर्थिक प्रगतीचा प्रमुख निकष बनवण्याचा या उपक्रमाचा संकल्प आहे.

या मोहिमेत एन. आर. नारायण मूर्ती, राजीव कुमार, रजत गुप्ता, श्रीकांत वेलमकन्नी, निशिथ देसाई यांसह अनेक नामवंतांचा सहभाग असणार आहे.

Comments are closed.