युपीएससी परीक्षेत थोडक्याच फरकानं मागे पडलेल्या हुशार विद्यार्थ्यांना आता मोठी संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या ३१ ऑगस्टच्या कार्यक्रमात सांगितलं की, ‘प्रतिभा सेतू’ नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अशा विद्यार्थ्यांना नामवंत खाजगी कंपन्यांमधून नोकरीची संधी दिली जाणार आहे.
मोदी म्हणाले, “अनेक जण जीवाचं रान करून युपीएससीची तयारी करतात, पण थोडक्याच गुणांनी अंतिम यादीबाहेर राहतात.
हीच प्रतिभा वाया जाऊ नये म्हणून ‘प्रतिभा सेतू’ सारख्या माध्यमातून १० हजारांहून अधिक उमेदवारांची माहिती एकत्र करून खाजगी कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाते.”
या कार्यक्रमात मोदींनी जम्मू-काश्मीरमधल्या क्रीडा कार्यक्रमांपासून, डोंगरातल्या आपत्तींवर एनडीआरएफ-एसडीआरएफचे कार्य, ‘खेलो इंडिया’ जल क्रीडा महोत्सव यांचा पण उल्लेख केला. त्याचबरोबर येणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या आणि ‘विश्वकर्मा योजना’बाबत माहिती दिली.
