मिरा भाईंदर महानगरपालिकेत भरतीची मोठी संधी आली आहे. २० ऑगस्टपासून एकूण ३५८ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक अशा विविध पदांसाठी संधी आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
मिरा भाईंदर ही महाराष्ट्रातील एक वेगाने विकसित होणारी महानगरपालिका असून, भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती तुम्ही mbmc.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.
भरतीमध्ये अग्निशामक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल), लिपिक टंकलेखक, स्वच्छता निरीक्षक, बालवाडी शिक्षिका, स्टाफ नर्स / GNM, प्रसूती परिचारिका, औषध निर्माता, चालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी तसेच ग्रंथपाल, लेखापाल, विधी अधिकारी, इलेक्ट्रिशियन, वायरमन अशा अनेक पदांसाठी जागा आहेत.
पात्रतेबाबत काही पदांसाठी पदवी आवश्यक आहे तर काहींसाठी १०वी, १२वी किंवा संबंधित डिप्लोमा/ITI प्रमाणपत्र बंधनकारक आहे. काही पदांसाठी अनुभव देखील आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे, मात्र मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज फी सामान्य वर्गासाठी १००० रुपये असून मागासवर्गीय व माजी सैनिकांसाठी फी कमी किंवा माफ करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा व त्याची प्रिंट नक्की काढून ठेवावी.

Comments are closed.