MHT-CET अर्जांना २ दिवसांची वाढ!-MHT-CET Gets 2-Day Extension!

MHT-CET Gets 2-Day Extension!

एमएचटी-सीईटी २०२६ साठी अर्ज नोंदणी चुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अर्जासाठी विशेष मुदतवाढ जाहीर केली आहे.

MHT-CET Gets 2-Day Extension!ही मुदतवाढ १९ आणि २० मार्च या दोन दिवसांसाठी लागू असून, विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे.

यापूर्वी अर्जाची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी होती. मात्र, विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज राहिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली असून, इच्छुकांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.