म्हाडाने यंदा घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून ४०२ घरांची आगाऊ नोंदणी तत्त्वावर विक्री सुरू झाली आहे.
नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर शिवार परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये ही घरे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अल्प उत्पन्न गटासाठी एकूण २९३ तर मध्यम उत्पन्न गटासाठी १०९ सदनिका उपलब्ध असून घरांच्या किंमती ₹१४.९४ लाख ते ₹३६.७५ लाख इतक्या आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुकांनी housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या संकेतस्थळांवर २३ डिसेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज नोंदणी आणि शुल्क भरावे.
ऑनलाइन अनामत रक्कम देखील याच मुदतीत भरता येईल, तर २४ डिसेंबरला बँकेच्या वेळेत RTGS/NEFT द्वारे अनामत भरता येणार आहे. नाशिकमध्ये परवडणाऱ्या घरांची ही सुवर्णसंधी असल्याने अर्जदारांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला म्हाडाकडून देण्यात आला आहे.

Comments are closed.