सर्वसामान्य माणसाचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता खरंच साकार होणार हाय! म्हाडानं ठाणे विभागात थेट २००० घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर केलीये. ही घरे ठाणे, कल्याण, शीळ, विरार अशा मुंबईच्या लागून असलेल्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे आता मुंबईच्या जवळ पण आपल्या बजेटमध्ये घर घेणं शक्य होणार!
सध्या म्हाडा कोकण मंडळाकडून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” तत्वावर काही घरांची विक्री सुरू आहेच, पण आता ऑगस्टमध्ये लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या लॉटरीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी वेगवेगळ्या योजना असणार आहेत.
“बुक माय होम” संकल्पनेखाली आणि जुनी न विकलेली घरेसुद्धा या योजनेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे अगदी ५ लाखांपासून घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरसाठी 1351 आणि नाशिकसाठी 1485 घरांसाठीही वेगळी लॉटरी चालू आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे.
तर मंडळी, बजेटमध्ये घर घ्यायचंय का? मग ही संधी सोडू नका – म्हाडाची २०२५ ची बंपर लॉटरी तुमचं घरकुल स्वप्न साकार करू शकते!