शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्यातून मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात 18,106 कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार असून ही नियुक्ती जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार आहे.
कमी विद्यार्थ्यांची संख्या असूनही शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी सरकारने ही मोठी भरती जाहीर केली आहे.
उच्च न्यायालयाने 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाला मान्यता दिल्यानंतर भरतीला औपचारिक हिरवा कंदील मिळाला आहे. नव्या नियमानुसार, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत 1 शिक्षक, तर 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत 1 नियमित + 1 कंत्राटी शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यातील सुमारे 18,106 शाळांमध्ये शिक्षकांची गरज भासल्यामुळे ही मोठी भरती सुरू होत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने समायोजनाची प्रक्रिया देखील सुरू आहे. नववी-दहावीच्या वर्गांत विद्यार्थीसंख्या 20 पेक्षा कमी असल्यास शिक्षक अतिरिक्त ठरणार असून, सुमारे 640 शाळांमधील 3,000 शिक्षकांवर याचा परिणाम होणार आहे.
64,000 जिल्हा परिषद शाळांपैकी 8,089 शाळांत विद्यार्थी 10 पेक्षा कमी आहेत, तर 18,106 शाळांत विद्यार्थी 20 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे या सर्व शाळांसाठी कंत्राटी शिक्षकांची मोठी भरती मोहीम राबवली जात आहे. पाचवी ते आठवीसाठीही पुढील काळात कंत्राटी भरतीची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील या भरतीमुळे शिक्षण विभागात नवचैतन्य येणार असून हजारो पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.