खुशखबर! महाराष्ट्रात मेगाभरतीची संधी – 18,882 पदांची मोठी भरतीचे अर्ज सुरु!

Mega Recruitment Opportunity in the State – 18,882 Posts to be Filled!!

0

महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे (Mahila Bal Vikas Bharti 2025). या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती केली जाणार असून, एकूण 18,882 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Mega Recruitment Opportunity in the State – 18,882 Posts to be Filled!!

भरती प्रक्रियेचा तपशील
महिला व बालविकास विभागांतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक आमिष स्वीकारू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारने एकूण 75,000 पदे भरण्याची योजना आखली असून त्यापैकी 18,000 पेक्षा जास्त पदे महिला व बालविकास विभागात भरली जातील.

मुख्यसेविका पदासाठी भरती
14 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या कालावधीत मुख्यसेविका पदासाठी सरळ सेवा आणि निवडीद्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेत एकूण 374 पदे भरली जातील. मंत्रालयात अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, महिला मंडळ आणि इतर संबंधित प्रश्नांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवणे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली.

मुख्यसेविकांची 100% पदभरती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यसेविका पदासाठी 102 म्हणजे 80% पदे सरळसेवेने तर 272 म्हणजे 100% पदे निवडीद्वारे भरली जातील. ही परीक्षा संपूर्ण पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अंगणवाडी केंद्रांचा विस्तार आणि सुविधा
राज्यात एकूण 553 बाल विकास प्रकल्प कार्यालयांअंतर्गत 1,10,591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदांसाठीही भरती करण्यात येणार आहे.

महिला बचत गटांसाठी आदर्श कम्युनिटी किचन
महिला बचत गटांनी एकत्र येऊन पोषण आहार पुरवठ्यासाठी आदर्श कम्युनिटी किचन सुरू करावे, यासाठी शासन विशेष निधी उपलब्ध करून देणार आहे. अंगणवाडी आहार पुरवठा करण्यासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्यांचे वाटप केले जाईल. तसेच, लाभार्थी संस्थांच्या कामगिरीच्या मूल्यमापनानंतर अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.