रेल्वेत बंपर नोकरी संधी!-Mega Railway Jobs Open!

Mega Railway Jobs Open!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वेने ग्रुप डी (लेव्हल १) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, २१,९९७ जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Mega Railway Jobs Open!ही भरती केवळ १० वी उत्तीर्ण किंवा ITI पास उमेदवारांसाठी आहे. इच्छुक उमेदवार २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या मेगा भरती अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. पदांमध्ये पॉइंट्समन, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट, लोको शेड स्टाफ इत्यादी विविध नोकऱ्या भरल्या जातील.

अर्जासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे, कमाल ३३ वर्षे असणे आवश्यक आहे. ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे, तर SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे वय सवलत लागू आहे.

रेल्वेने पारदर्शक फी प्रणाली ठेवली आहे. उघड्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी, SC/ST/महिला/दिव्यांग/माजी सैनिकांना २५० रुपये फी भरावी लागेल, जी परीक्षा नंतर परत मिळेल. अर्जात बँक खाते क्रमांक व IFSC कोड अचूक भरणे अनिवार्य आहे.

Comments are closed.