पश्चिम रेल्वे अंतर्गत 2865 अप्रेंटिस पदांसाठी थेट भरती जाहीर!-Mega Railway Job Chance!

Mega Railway Job Chance!

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी एक अफलातून संधी आहे! पश्चिम रेल्वेने 2865 अप्रेंटिस पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे. ही भरती रेल्वेमध्ये करिअर घडवण्याची एक मोठी संधी आहे.

Mega Railway Job Chance!अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे वेळ न दवडता लवकर अर्ज करा.

पदांची एकूण संख्या 2865 असून त्यामध्ये विविध प्रवर्गानुसार वाटप केलं आहे — सामान्य प्रवर्गासाठी 1150, अनुसूचित जातींसाठी 433, अनुसूचित जमातींसाठी 215, ओबीसीसाठी 778 आणि ईडब्ल्यूएससाठी 289 पदं राखीव ठेवण्यात आली आहेत.

वयोमर्यादा 16 ते 24 वर्षांदरम्यान असावी. अनुसूचित जाती-जमातींना 5 वर्षांची, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सवलत मिळेल. शिक्षणासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10वी पास असणे आवश्यक आहे. शिवाय, ITI (NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त) प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे.

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड फक्त 10वी आणि ITI मधल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. त्यामुळे चांगले गुण असलेले उमेदवारांना अधिक संधी आहे.

अर्ज शुल्काबाबत बोलायचं झालं, तर सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क आणि ₹41 प्रक्रिया शुल्क आहे. SC/ST उमेदवारांना फक्त ₹41 प्रक्रिया शुल्क भरावं लागेल.

अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  • पासपोर्ट साईज फोटो

  • 10वीचं प्रमाणपत्र

  • ITI प्रमाणपत्र

  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

ऑनलाइन अर्जच मान्य असतील. अर्ज पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरायचा आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी टाळता येतील.

रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लगेच अर्ज करा आणि सरकारी नोकरीच्या रेसमध्ये पुढे जा!

Comments are closed.