सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एकदम झकास बातमी आलीये! नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मोठी भरती जाहीर झाली असून तब्बल 186 पदं भरायची आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज nmc.gov.in वरून करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख 1 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे. वेळ न दवडता लगेच अर्ज करणं उत्तम!

पदांची माहिती:
- चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) – 36 पदे
- फायरमन (अग्निशामक) – 150 पदे
एकूण – 186 पदे
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1 साठी पात्रता: उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे घेतला जाणारा 6 महिन्यांचा अग्निशामक कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, वाहनचालक या पदावर किमान 3 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
- पद क्र. 2 साठी पात्रता: उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि मुंबई येथील राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अग्निशामक कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 1 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ उमेदवारांना 5 वर्षे सवलत
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग – ₹1000/-
- मागासवर्गीय / अनाथ – ₹900/-
पगार:
- चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन): ₹19,900 ते ₹63,200
- फायरमन (अग्निशामक): ₹19,900 ते ₹63,200
सरकारी नोकरी + स्थिर पगार + महानगरपालिकेची पोस्ट — ही संधी चुकवू नका!

Comments are closed.