महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईनंतर अखेर राज्य सीईटी कक्षाने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपासून पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार असून २४ सप्टेंबरला निवड यादी जाहीर होईल. निवड झालेल्या उमेदवारांनी २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.
देशभरातील नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळणे व आधीच्या महाविद्यालयांत तुकड्या वाढवण्याच्या प्रक्रियेने राज्यातही प्रवेश वेळापत्रकावर परिणाम झाला. त्यामुळे पहिल्या फेरीतच विलंब झाला आणि दुसरी फेरीही लांबणीवर गेली. आता सहा हजार ८५० नव्या जागा समाविष्ट झाल्यानंतर अखेर दुसऱ्या फेरीसाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे.
या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित होण्याची उत्सुकता वाढली आहे.

Comments are closed.