वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणीसाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (MCC) निर्णयानंतर राज्य सीईटी कक्षानं जाहीर केली.
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची सुरुवात २३ जुलैपासून झाली होती. आधी ३० जुलै अखेरची तारीख होती, पण सेंट्रल काउंसिलिंगसाठीची मुदत वाढल्यामुळे राज्यातही ती ४ ऑगस्टपर्यंत वाढवली गेली.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट रात्री ११:५९ पर्यंत कागदपत्रे व फी भरायची आहे.
६ ऑगस्टला गुणवत्ता यादी व जागांचा तपशील जाहीर होईल.
६ ते ९ ऑगस्टदरम्यान महाविद्यालय पसंतीक्रम भरायचे आहेत.
११ ऑगस्टला पहिल्या फेरीची निवड यादी, आणि
१२ ते १७ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे.
राज्यात विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एकूण ४८,०३९ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये –
एमबीबीएस – ८,१४१ जागा
बीएएमएस – ९,७३१
बीएचएमएस – ४,४१७
बीडीएस (दंतशास्त्र) – २,६७५
त्यात ३६ सरकारी, ५ अनुदानित आणि २३ खासगी कॉलेजचा समावेश आहे.
