एमबीबीएस–बीडीएस ९९७ सीट वाटप!-MBBS–BDS 997 Seats Allotted!
MBBS–BDS 997 Seats Allotted!
राज्य सीईटी सेलनं एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या फेरीत तब्बल ९९७ विद्यार्थ्यांना सीटचं वाटप शनिवारी करून टाकलं. आता या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत कॉलेजात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ८,०४८ सीट्स भरल्या, तर बीडीएसच्या २,२१० सीट्स पूर्ण झाल्या होत्या. आता स्ट्रे व्हॅकन्सी फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करत या ९९७ जणांना विविध कॉलेजांत सीट मिळाल्या आहेत.
मात्र, नागपूर हायकोर्टातल्या एका याचिकेच्या निकालावर या फेरीत मिळालेल्या प्रवेशांचं भविष्य ठरणार आहे, असं सीईटी सेलनं जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टेन्शन वाढलं आहे.
- अद्याप ३८७ सीट रिक्तच
यंदा सरकारी एमबीबीएस कॉलेजांत ४,९३६ सीट्स असून त्यापैकी ४,८९९ भरल्या आहेत; तर खासगी कॉलेजांत ३,४९९ सीट्समधून ३,१४९ भरल्या असून ३७ सरकारी + ३५० खासगी = ३८७ सीट्स अजूनही रिक्त आहेत.
राज्यात यंदा एमबीबीएसच्या एकूण ८,४३५ आणि बीडीएसच्या २,७१८ सीट्स उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत ६,८४८ आणि दुसऱ्या फेरीत १,४११ सीट विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.

Comments are closed.