पुण्यातून शिक्षणक्षेत्रातील मोठी बातमी! वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक सुवर्णसंधी खुली झाली आहे. सीईटी सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी तिसरी फेरी जाहीर केली असून, या फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंदणीची संधी देण्यात आली आहे.
नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ८ ऑक्टोबर सायंकाळी ५:३० पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्याच मुदतीत शुल्क भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
९ ऑक्टोबर रोजी तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार असून, १५ ऑक्टोबर रोजी अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात असून, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेशाची नवी संधी मिळणार आहे.

Comments are closed.