नीट यूजी २०२५ अंतर्गत एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत मोठा बदल करण्यात आला आहे. अखिल भारतीय कोटा (१५ टक्के), केंद्रीय व अभीमत विद्यापीठे तसेच सर्व एम्स संस्थांसाठी ही फेरी महत्त्वाची ठरते.
या बदलाचे कारण म्हणजे नव्याने सुरू झालेली वैद्यकीय महाविद्यालये व वाढीव जागा. विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक सुधारित केले आहे.
रविवारी पर्याय नोंदणी पूर्ण झाली असून, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पर्याय निश्चिती करता येणार आहे. यानंतर १५ व १६ सप्टेंबरदरम्यान जागा वाटप प्रक्रिया पार पडेल.
१७ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांनी १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. महाविद्यालयांना २६ व २७ सप्टेंबरदरम्यान रिपोर्टिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून एका टप्प्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.