एमबीबीएस १५० नवीन जागा महाराष्ट्रात-MBBS: 150 New Seats in Maharashtra
MBBS 150 New Seats in Maharashtra!
विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) ने देशभरातील एमबीबीएस अभ्यासक्रमात २,३०० नवीन जागा वाढवल्या आहेत, ज्यात महाराष्ट्रात १५० जागांचा समावेश आहे. या नव्या जागांमुळे तिसऱ्या फेरीसाठी एकूण ४,९५० जागा उपलब्ध झाल्या आहेत.

केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी नवीन महाविद्यालये सुरू करत आहेत व विद्यमान महाविद्यालयांमध्येही जागा वाढवत आहेत. गेल्या आठवड्यात MCC ने आधी २,६५० जागा वाढवल्या होत्या, त्यानंतर पुन्हा १७ ऑक्टोबरला २,३०० जागा नव्याने वाढविण्यात आल्या.
महाराष्ट्रात पनवेलमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयात १००, तसेच मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये ५० जागा मिळाल्या आहेत. याआधी नागपूरमधील दत्ता मेघे आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातही जागा वाढवण्यात आल्या होत्या. यामुळे तिसऱ्या फेरीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ३०० जागा उपलब्ध राहणार आहेत.
गेल्या वर्षभरात ४१ शासकीय आणि १२९ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यामुळे १०,६५० नवीन जागा देशभरात उपलब्ध झाल्या. आता देशभरात एमबीबीएससाठी एकूण १,३७,६०० जागा उपलब्ध आहेत. पंतप्रधानांनी २०२४ मध्ये ७५ हजार नवीन जागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते आणि हे प्रयत्न त्याच दिशेने सुरू आहेत.

Comments are closed.