Punjab सरकारने राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. राज्याचे अर्थमंत्री Harpal Singh Cheema यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री मावां-धियां सत्कार योजना’ लागू करण्याची घोषणा केली.

या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाणार असून अनुसूचित जाती वगळता इतर सर्व महिलांना दरमहा ₹१,००० तर अनुसूचित जातीच्या महिलांना ₹१,५०० इतकी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ १८ वर्षांवरील सर्व पात्र महिलांना मिळणार असून ही रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
Aam Aadmi Party ने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री Bhagwant Mann यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ही विशेष घोषणा करण्यात आली. मात्र निवडणुकीत दिलेले आश्वासन चार वर्षांनंतर पूर्ण केले जात असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका देखील केली आहे.

Comments are closed.