एसईबीसी’ प्रमाणपत्र द्यायला अजून मुहूर्त मिळेना; – Maratha sebc caste certificate

0

Maratha sebc caste certificate – पोलिस भरतीसाठी राज्यसरकारने मराठा आरक्षण मोठ्या उत्साहात लागू केले मात्र त्यासाठी उमेदवारांची अक्षरशः हेळसांड चालविली आहे. ५ मार्चला ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झाली मात्र मागील पंधरा दिवसात मराठा आरक्षणासाठीचे ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र अद्यापही मिळू शकले नाही. संबंधित आयटी कंपनीकडून प्रमाणपत्राबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. यामुळे आता अर्जदाखल करण्यासाठी मुदतवाढ देणे क्रमप्राप्त आहे. राज्यसरकारने १७४३० जागांवरील पोलिस भरतीसाठी ५ ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. यामध्ये दहा टक्के जागांवर मराठा आरक्षण दिले आहे.

त्यासाठी एसईबीसी (Maratha sebc caste certificate सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) हे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेयर (प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबद्दलचे) प्रमाणपत्र देण्यासंदभातील मार्गदर्शक सूचना देण्यात १० मार्च उजाडला. यानंतर महाआयटी कंपनीकडून एसईबीसी प्रमाणपत्रासाठीच्या बाबी ‘अपडेट’ करणे आवश्यक होते.

मात्र अद्यापही संबंधित कंपनी सुस्त असल्याने राज्यभरातील सेतूकेंद्रांचे एसईबीसीबाबतचे काम ठप्प झाले आहे. हजारो विद्यार्थी सेतूकेंद्रांवर आणि तहसील कचेरीत हेलपाटे मारून थकले आहेत. निवडणुकीत रमलेल्या लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाह अशी उमेदवारांची भावना झाली आहे.

महिनाभराची मुदतवाढ हवी
पोलिस भरतीच्या अर्जासाठी ३१ मार्च अंतिम मुदत आहे आणि अद्याप एसईबीसीचा सरकारी गोंधळ मिटलेला नसल्याने वेळेत दाखले मिळणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे अर्जाची मुदत अजून एक महिनाभर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना पोलिस भरतीपासून मुकावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.