दहावी हॉल तिकीट जाहीर!-Maharashtra SSC Hall Ticket Released!

Maharashtra SSC Hall Ticket Released!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वी (SSC) परीक्षेचे हॉल तिकीट 2026 जाहीर केले आहे. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून, हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Maharashtra SSC Hall Ticket Released!शाळांनी mahahsscboard.in किंवा mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून लॉगिन करून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. विद्यार्थ्यांकडून यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. परीक्षेला जाताना शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का असलेले प्रवेशपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी संस्थेला अधिकृत लॉगिन आयडी व पासवर्ड वापरावा लागतो. रोल नंबरची श्रेणी निवडल्यानंतर हॉल तिकीट उपलब्ध होते व त्याची प्रिंट काढता येते. हे प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, हॉल तिकीटवरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा फोटोमध्ये त्रुटी आढळल्यास शाळेमार्फत ऑनलाइन दुरुस्ती अर्ज सादर करावा लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर दुरुस्त केलेले प्रवेशपत्र उपलब्ध होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.